राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी रेखा जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, सुपारी देऊन हत्या केल्याचे स्पष्ट

सुर्यकांत वरखड
Wednesday, 2 December 2020

राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी तथा यशस्विनी महिला बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे पाटील (वय 40) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

अहमदनगर : राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी तथा यशस्विनी महिला बिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा भाऊसाहेब जरे पाटील (वय 40) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यातील एकजण केडगाव येथील असल्याचे समजते. हत्या सुपारी घेऊन केल्याचे समोर येत आहे.

अधिक माहिती अशी : रेखा जरे पाटील त्यांची आई, मुलगा व महिला बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने, असे सर्वजण मोटारीने पुण्याहून नगरकडे येत होते. शिरूरच्या पुढे निघाल्यावर मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या मोटारीला कट मारला. नंतर मोटारीला ओव्हरटेक करीत पुढे जाऊन दुचाकी आडवी लावली. मोटार थांबल्यानंतर त्यांनी जरे पाटील यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. बाचाबाची सुरू असतानाच, एकाने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला.

त्यात उपचारापूवीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. याबाबत सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने काल रात्री कोल्हार येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यातील एकजण केडगावच्या येथील असल्याने समजते. जरे यांची हत्या सुपारी देऊनच झाल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याचे समजते. आता पोलिस मास्टर माइंडचा शोध घेत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested in Rekha Jare Patil murder case