esakal | जादूची कांडी फिरल्याप्रमाणे लगेचच सगळं होईल असे नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Three crore from Zilla Parishad for water scheme in Karjat Jamkhed constituency

राष्ट्रीय पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत अनुसुचित जाती जमाती उपाययोजना घटकासाठी 2020- 21 या आर्थिक वर्षात केंद्र हिस्स्याचा निधी स्तरावर प्रलंबित होता.

जादूची कांडी फिरल्याप्रमाणे लगेचच सगळं होईल असे नाही

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : राष्ट्रीय पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत अनुसुचित जाती जमाती उपाययोजना घटकासाठी 2020- 21 या आर्थिक वर्षात केंद्र हिस्स्याचा निधी स्तरावर प्रलंबित होता. आणि या योजनेस केंद्र हिस्स्याचे अनुदान प्राप्त झाल्याशिवाय राज्य हिस्स्याचे शासनाकडील अनुदान उपलब्ध होत नाही. 

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता आमदार रोहित पवारांच्या ही बाब लक्षात आली. या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार पवार यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करत या अनुदानासाठी पाठपुरावा केला. 

आमदार पवारांच्या पत्रव्यवहारानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला. या योजनेत जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत सुमारे 36 गावांचा सामावेश असुन त्यात कर्जत तालुक्यातील आठ गावे तर जामखेड तालुक्यातील 11 गावांचा सामावेश आहे.

कर्जत- जामखेड मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातील इतर गावांचाही संबंधित प्रलंबित अनुदानाचा प्रश्न सुटला आहे.आ. रोहित पवार तसेच नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांच्याही पाठपुराव्याने हा अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

जल जीवन मिशनचे अभियान संचालक यांच्या 25 नोव्हेंबरच्या पत्रान्वये जिल्ह्यातील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत अनुसुचित जाती-जमाती उपाय योजनेचे तीन कोटी 11 लक्ष प्रलंबित अनुदान जल जीवन मिशन अंतर्गत वितरित करण्यात आले आहे.

दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. जादूची कांडी फिरल्या प्रमाणे लगेचच सगळं होईल असे नाही. कुठल्याही कामस अभ्यास, त्याची सद्यस्थिती आणि उपाययोजना बाबत पाठपुरावा करावा लागतो. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून काही कालखंडात मतदारसंघाचा झालेला विकास स्वप्नवत वाटेल.
- रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image