esakal | तीन दिवसांनंतर सापडला धबधब्यात पडलेल्या पोलिसाचा मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

Three days later, the body of a policeman was found lying in a waterfall

नगर येथील चार रेल्वे पोलीस कर्मचारी रूई चोंडा धबधबा या पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी बंदी असतानाही आले होते. यातील गणेश दहीफळे रा.खरवंडी कासार (ता.पाथर्डी), धबधब्या जवळ छायाचित्र काढण्यासाठी गेल्यानंतर तोल गेल्याने पाण्यात पडले

तीन दिवसांनंतर सापडला धबधब्यात पडलेल्या पोलिसाचा मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : मांडओहोळ (ता.पारनेर) धरण परीसरातील रूई चोंडा धबधब्यात छायाचित्र काढताना (ता.२४) रोजी पाण्यात पडल्यानंतर बेपत्ता झालेले रेल्वे पोलिस गणेश दहिफळे यांचा मृतदेह वासुंदेमधील शिक्रीजवळील ठाकरवाडीत आला आढळून आला. गेल्या तीन दिवस एनडीआरएफसह विविध यंत्रणा धबधब्याखाली शोध मोहीम सुरू होती.

याबाबत माहिती अशी की, नगर येथील चार रेल्वे पोलीस कर्मचारी रूई चोंडा धबधबा या पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी बंदी असतानाही आले होते. यातील गणेश दहीफळे रा.खरवंडी कासार (ता.पाथर्डी), धबधब्या जवळ छायाचित्र काढण्यासाठी गेल्यानंतर तोल गेल्याने पाण्यात पडले, पोहता येत नसल्याने या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या खोल जागेत पाण्यात बुडाले. गुरूवार(ता.२४)पासून तहसीलदार ज्योती देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिक,पोलीस यंत्रणा,अग्निशमन दल,आपत्ती व्यवस्थापन यांच्या मार्फत शोधमोहिम सुरू होती.

आज (ता.२६) रोजी पुणे येथील एनडीआरएफने शोधमोहिम राबवली. सकाळपासून मोहीम सुरू केली होती. सायंकाळी पाचनंतर त्यांनी शोधमोहिम थांबवली होती. दरम्यान वासुंदे येथील सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटोळे यांनी मांडोओहळ नदीपात्रातील ठाकरवाडीतील शिक्रीजवळ एक मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला कळविले.

हालाखिच्या परिस्थितीतून झाले होते भरती

गणेश यांचे आई-वडील हे उस तोड कामगार आहेत. त्यामुळे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मामाच्या गावी राहून गणेश यांनी शिक्षण पूर्ण केले. सुमारे आठ वर्षांपूर्वी आपल्या जिद्द व परिश्रमाच्या बाळावर गणेश रेल्वे पोलिसांत भरती झाले. चार वर्षांपूर्वी गणेश यांचे लग्न झाले. त्यांना दोन वर्षे वयाचा एक मुलगा आहे. घरी पोटापुरती शेती असल्याने आई-वडिलांचे कष्ट कमी करण्यासाठी गणेश यांचे नेहमीच प्रयत्न होते, असे गणेश त्यांचे थोरले बंधू राजकुमार दहिफळे यांनी सांगितले.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top