esakal | आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून होणाऱ्या गोडाऊनचा ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

Three Districts will benefit from the godown created by the efforts of MLA Rohit Pawar

खर्डा (ता. जामखेड) येथे पाच कोटीचे शासकीय वखार महामंडळाचे दोन गोडावून लवकरच होणार, असून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खर्डा येथे भेट देऊन जागेची पहाणी केली. 

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून होणाऱ्या गोडाऊनचा ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : खर्डा (ता. जामखेड) येथे पाच कोटीचे शासकीय वखार महामंडळाचे दोन गोडावून लवकरच होणार, असून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याल्या यश आले आहे, वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खर्डा येथे भेट देऊन जागेची पहाणी केली. 
आमदार पवार यांच्या कल्पनेतून खर्डा येथे शासकीय वखार महामंडळाचे गोडाऊन होणार आहे. खर्डा व परिसराच्या वैभवात यामुळे भर पडणार आहे. पुणे येथील शासकीय वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक भरत एखे व वखार महामंडळाचे उपव्यवस्थापक इंजिनियर राजाराम अडगळे यांनी खर्डा भेट देऊन पाहणी केली. येथील पैठण ते पंढरपूर या महामार्गावरील कानिफनाथ मंदिराजवळील जागेची पाहणी करून याबाबत तीन एकर जागा आरक्षित करून 22 बाय 42 मीटर असे 1800 मेट्रिक टनाची दोन गोडाऊनचे इस्टिमेट लवकरच करून या संदर्भात टेंडर काढून या कामास मान्यता मिळेल, असे वखार महामंडळाचे व्यवस्थापक एखे यांनी सांगितले. येथील राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी याबाबत आमदार पवार यांच्याशी संपर्क साधून हे शासकीय वखार महामंडळाचे गोडावन लवकर व्हावे, याबाबत चर्चा केली होती.
खर्डा हे तीन जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या बाबत प्रशाकीय बाबींचा पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याने खर्डेकरंच्या वैभवात मोठी  भर पडली आहे. याचा तीन ते चार जिल्ह्याला मोठा फायदा होणार असल्याचे आमदार पवार यानी सांगितले आहे. या शासकीय वखार महामंडळाच्या गोडाऊनचा उपयोग हजारो शेतकरी व अन्य खते बियाणे ठेवण्यासाठी होणार आहे. याचा फायदा  उस्मानाबाद, बीड, लातूर या जिल्हाला होणार आहे. यातून रोजगार निर्मितीही होणार आहे.

वखार महामंडळाची मुख्य कार्ये

 • - राज्यात योग्य ठिकाणी जमिनी संपादन करून गोदामे व वखारी बांधणे.
 • - राज्यात कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे, कापूसगाठी, औद्योगिक माल आणि अनुसूचित वस्तूंसाठी शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करणे.
 • - कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे आणि अनुसूचित वस्तू यांच्या वाहतुकीच्या सुविधांची व्यवस्था करणे.
 • - केंद्रीय वखार महामंडळ किंवा शासनाचे प्रतिनिधी म्हणून कृषि उत्पादने, बियाणे, खते, शेती अवजारे, अनुसूचित बाबी यांची खरेदी, विक्री, साठवणूक व वितरण करणे.
 • महामंडळातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधा
 • - शेतकऱ्याकरिता शेती व्यवसायासाठी सुविधा देणे
 • - शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची साठवणूक महामंडळाकडे केल्यांस वखार भाडयात ५० टक्के सवलत देणे. 
 • - ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख (Negotiable Instrument) असल्याने ती बॅंकेकडे तारण ठेवल्यास, ठेवीदारांना बॅंकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध होते. त्या आधारे शेतकऱ्यांना हंगामात बॅंकेकडून अर्थ साहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामांत साठवणुकीची सोय मिळते.
 • - शेती मालापासून ते औद्योगिक मालापर्यंत मालप्रकारांची शास्त्रशुद्ध साठवणूक करता येते.
 • - डी. डी. व्ही. पी., मॅलेथिऑन या औषधाचा प्रतिबंधात्मक व ॲल्युमिनियम फॉस्फाइडचा कीटकनाशक म्हणून नियमित वापर करून मालाचे संरक्षण केले जाते.
 • - सर्व साठवणुकीला विमा संरक्षण असते.
 • - हाताळणी व वाहतुकीची सुविधा मान्यताप्राप्त ठेकेदारांमार्फत पुरविली जाते.
 • - साठवणुकीच्या काळात,महामंडळ ठेवीदाराच्या साठ्याचा दर्जा टिकविते व नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई देते.
 • - शुल्कबंध वखारकेंद्रामधून आयातदारांना शुल्कबंध साठवणुकीच्या सोयी मिळतात.
 • फायदे संपादन करा
 • - महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य साठवणुकासाठी २५ टक्के जागा राखून ठेवलेली असते.
 • - मालाची प्रत टिकून राहील्याने ठेवीदारांचा आर्थिक फायदा होतो.
 • - महामंडळाद्वारे गोदामात साठवलेल्या सर्व प्रकारच्या मालाचा आग, पूर, चोरी इ. धोक्यापासून संरक्षणासाठी १०० टक्के विमा उतरविलेला असतो.
 • - महामंडळाचच्या सर्व वखार केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने, दैनंदिन पूर्णवेळ (२४X७) सुरक्षारक्षक नेमलेले आहेत.