esakal | वह्या आणण्यासाठी म्हणून गेलेली अल्पवयीन मुलगी परत आलीच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Three girls abducted in Parner taluka in 12 days

12 दिवसांत तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. देसवडे येथून २ सप्टेंबरला, शेरी कासारी येथून तीन रोजी व सारोळा आडवाई येथून गुरुवारी (ता.10) अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले.

वह्या आणण्यासाठी म्हणून गेलेली अल्पवयीन मुलगी परत आलीच नाही

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यात मागील 12 दिवसांत तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. देसवडे येथून २ सप्टेंबरला, शेरी कासारी येथून तीन रोजी व सारोळा आडवाई येथून गुरुवारी (ता.10) अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. त्यामुळे पालक चिंतेत पडले आहेत. तिन्ही पालकांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात अपहरणाच्या फिर्यादी दिल्या आहेत. 

देसवडे येथून २ सप्टेंबर रोजी 17 वर्षीय मुलीस कोणी तरी पळवून नेले. नंतर शेरी कासारी येथील 17 वर्षीय मुलीस ३ सप्टेंबर रोजी शेरी कासार येथून कोणीतरी पळवून नेले. सारोळा अडवाई येथून 17 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद तिच्या वडीलांनी दिली. फिर्यादीनुसार, मुलगी 10 सप्टेंबरला सकाळी मैत्रिणीकडे वह्या आणण्यासाठी जामगाव येथे गेली असता, ती परत आली नाही. सगळीकडे चौकशी करूनही ती सापडली नाही.

संपादन : अशोक मुरुमकर