शोकांतिका! कुटुंबातील तिघांना कोरोनाने नेले, घर चोरांनी लुटले!

जामखेड शहरातील जाधव कुटुंबावर काळाचा घाला
कोरोनामुळे मृत्यू
कोरोनामुळे मृत्यूई सकाळ

जामखेड : आठवडाभरात एकाच कुटुंबातील तिघांना मृत्यूने गाठले, तर तिघेजण कोरोनाशी रुग्णालयात झुंज देत आहेत. जामखेड शहरातील हे अभागी कुटुंब आहे! संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाचा संसर्ग झाला होता. एकापाठोपाठ एक रुग्णालयात दाखल झाले. तिघांची परिस्थिती सुधारते आहे. मात्र, तिघांचा मृत्यू झाला. तिघांपैकी एकाच्याही अंत्यविधीला कुटुंबातील इतर सदस्यांना उपस्थित राहता आले नाही. (Three members of the same family die in Jamkhed)

कोरोनामुळे मृत्यू
लंकेंच्या कोविड सेंटरला जमली कोटीची मदत! कोकणचा हापूस, मावळातून तांदूळ

जामखेड येथील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागातील सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी लक्ष्मण जाधव (वय - 65), त्यांची पत्नी लक्ष्मी (वय-60) व मुलगा श्रीकांत या तिघांचा आठवड्यात एकापाठोपाठ कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अगोदर लक्ष्मण जाधव गेले. दोन दिवसांनी मुलगा श्रीकांत गेला. पती आणि मुलाच्या धक्क्यातून लक्ष्मीबाईही सावरल्या नाहीत. श्रीकांतची पत्नी रेखा शेवगाव येथे कोरोना संसर्गावर उपचार घेत आहे. तर धाकटा मुलगा प्रशांत व त्याच्या पत्नीवर संगमनेरमध्ये उपचार सुरू आहेत. याच कुटुंबातील चार चिमुरडे मोठ्या धाडसाने या परिस्थितीचा सामना करीत आहेत.

हा कोप कमी होता म्हणून की नियतीने त्यांना आणखी एक हादरा दिला. आयुष्यभर मोठ्या कष्टातून उभी केलेली पुंजी, सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. या संदर्भात जामखेड पोलिसात गोविंद जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मण जाधव यांच्या कुटुंबाचा आधारवड, मार्गदर्शक असलेला उद्योजक भाचा नितीन शहा यांचेही नगर येथे कोरोनाने निधन झाले. असे धक्के पचवलेल्या जाधव कुटुंबाच्या घरी चोरी झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

लवकर तपास लावा

"लक्ष्मण जाधव यांच्या कुटुंबातील तिघांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला तर तिघे जण कोरोनाशी संघर्ष करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणि दुसरीकडे जाधव यांच्या घरी चोरी झाली. याचा तपास पोलिस विभागाने तात्काळ लावावा."

- अमित जाधव, नगरसेवक, जामखेड.

(Three members of the same family die in Jamkhed)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com