esakal | मास्क न लावणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन पथके
sakal

बोलून बातमी शोधा

Three squads to take action against those who do not wear masks

शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याने, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले.

मास्क न लावणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी तीन पथके

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्क आवश्‍यक आहे. तो न लावणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलिस व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. त्यानुसार महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी शहरात मास्क न लावता वावरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तीन पथके नियुक्‍त केली आहेत. या पथकांत महापालिकेच्या 26 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. 

शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याने, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले. पोलिस व स्थानिक स्वराज्य संस्थांना कारवाईचे निर्देशही दिले. त्यानुसार आज महापालिका आयुक्‍त मायकलवार यांनी बैठक घेऊन तीन पथके तयार केली आहेत. या पथकांना समन्वयक अधिकारी म्हणून सहायक आयुक्‍त सचिन राऊत, प्रभाग अधिकारी संतोष लांडगे व सहायक आयुक्‍त एस. बी. तडवी यांची नियुक्‍ती केली. त्यांच्या हाताखाली 26 कर्मचारी असतील. प्रत्येक कर्मचाऱ्याला एका मोठ्या चौकात नियुक्‍ती देण्यात आली आहे. राऊत यांच्याकडील पथक सावेडी उपनगरातील एकवीरा चौक, ढवणवस्ती, बालिकाश्रम रस्त्यावरील भुतकरवाडी चौक, तारकपूर परिसरातील कंवर महाराज पुतळा, भिस्तबाग चौक, नेप्ती नाका, तेली खुंट, दिल्ली गेट, अप्पू हत्ती चौक, कोठला, गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक या परिसरासाठी नियुक्‍त केले असून, पथकात 12 कर्मचारी आहेत. 
संतोष लांडगे यांच्याकडे पंचपीर चावडी, रेल्वे स्टेशन परिसरातील शिवनेरी चौक, केडगाव बायपास, इंपिरिअल चौक, आयुर्वेद महाविद्यालय कोपरा, रंगोली हॉटेल, चाणक्‍य चौक, कोठी चौक हा भाग देण्यात आला आहे. त्यांच्या पथकात आठ कर्मचारी आहेत. तडवी यांच्याकडे विजयलाइन चौक, मार्केट यार्ड, मुकुंदनगर, जिल्हा पोलिस अधीक्षक चौक, भिंगार वेस परिसर दिला आहे. त्यांच्या पथकात सहा कर्मचारी आहेत. ही पथके मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी 100 रुपये दंड करणार आहेत.