संगमनेरमध्ये बाधितांचा आकडा गेला तीन हजारांवर

आनंद गायकवाड
Monday, 28 September 2020

प्रशासनाने शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांपासून मोहीम सुरू केली. महसूल विभागातील पोलिस पाटलांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. यातून दोन पोलिस पाटलांसह 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

संगमनेर ः तालुक्‍यात प्रशासनाने रुग्णसंख्येला महत्त्व देण्यापेक्षा बाधित रुग्ण शोधण्यावर लक्ष केंद्रित केले असून, बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून चाचण्या वाढविल्या आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्‍याने दोन हजार 956ची रुग्णसंख्या गाठली आहे. 

प्रशासनाने शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांपासून मोहीम सुरू केली. महसूल विभागातील पोलिस पाटलांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. यातून दोन पोलिस पाटलांसह 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

गेल्या दोन-तीन दिवसांत रुग्ण आढळण्याचा वेग काही प्रमाणात घटला; मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा चाचण्यांचा वेग वाढल्याने शहरासह तालुक्‍यात बाधित रुग्ण समोर येण्याची गतीही वाढली आहे.

गुरुवारपासून शासकीय सेवेतील सर्व विभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या सुरू केल्या. त्यातून महसूल विभागातील पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्यांची संख्या अधिक आहे. 
अहमदनगर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand corona patients in Sangamner