संगमनेर : बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारी तीन वाहने घारगाव पोलिसांनी साकूरजवळील बिरेवाडी फाटा येथे मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पकडली. या कारवाईत पोलिसांनी तेरा जनावरांची सुटका करत ९ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.