धक्कादायक: नगरमध्ये बिबट्याने आईच्या कुशीतून तीन वर्षांच्या चिमुकल्याला उचलून नेलं, मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तालुक्यातील करडवाडी येथील तीन वर्षांच्या मुलाला बिबट्याने घरातून उचलून नेल्याची घटना घडली आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तालुक्यातील करडवाडी येथील तीन वर्षांच्या मुलाला बिबट्याने घरातून उचलून नेल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलाला शोधण्यासाठी शोधमोहिमही सुरु केली होती. त्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. 

बिबट्याने रात्री आईच्या कुशीतून तीन वर्षांच्या मुलाला उचलून नेलं होतं. त्यानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर सकाळी चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सार्थक बंधवत असं या तीन वर्षांच्या मुलाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मदतीने मुलाचा शोध घेणं सुरु होतं. 15 दिवसांमध्ये बिबट्यानं हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three year baby was abducted by a leopard in Pathardi taluka