esakal | बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक प्रगती साधली : आमदार निलेश लंके
sakal

बोलून बातमी शोधा

Through self help groups women made economic progress

देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बरोबरीने योगदान देत आहेत.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक प्रगती साधली : आमदार निलेश लंके

sakal_logo
By
सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बरोबरीने योगदान देत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. 

महिलांच्या सक्षमीकरणाकडे टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या संसाराला व आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावला आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

सावरगाव (ता. पारनेर) येथील मानेवाडीमधील जिजाऊ बचत गटाच्या माध्यमातून आमदार लंके यांच्या हस्ते दिवाळीनिमीत्त गरजू कुटूंबांना किराणा वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार लंके म्हणाले, 30 रूपयांपासून या बचत गटाची सुरूवात करण्यात आल्यानंतर आता बचत गटाकडे तब्बल 11 लाख 50 हजार रूपयांची शिल्लक आहे.

बचत गटाच्या माध्यमातून गटातील सदस्य महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधत कुटूंबाला हातभार लावला. स्वतः ची समृद्धी झाल्यानंतर गरजूंचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांनी पुढाकार घेत किराणा वस्तूंचे वितरण करण्यात आले हा कौतुकास्पद उपक्रम आहे. यावेळी सरपंच अँड राहुल झावरे,बचत गटाच्या अध्यक्षा सुवर्णा माने,बापु शिर्के,उपाध्यक्ष रेखा माने,रेखा माने,सखुबाई माने उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top