नगरचे आजचे कोरोना मीटर सहाशेवर

अमित आवारी
Monday, 28 September 2020

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 107 रुग्णांपैकी नगर शहरातील 31, 
अकोले तीन, जामखेड तीन, कोपरगाव पाच, नगर ग्रामीण नऊ, नेवासे चार, पारनेर चार, पाथर्डी पाच, राहाता 12, राहुरी नऊ, संगमनेर चार, शेवगाव सहा, तसेच श्रीरामपूरमधील 12 रुग्णांचा समावेश आहे. 

नगर: जिल्ह्यात आज तब्बल 856 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 37 हजार 531 झाली आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 600ने वाढ झाली, तर 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता चार हजार 334 झाली आहे. 
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत 78, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 107 आणि अँटिजेन चाचणीत 415 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 34, अकोले 14, जामखेड एक, कर्जत दोन, नगर ग्रामीण 11, नेवासे चार, पारनेर तीन, संगमनेर पाच, शेवगाव एक, श्रीगोंदे दोन, तसेच श्रीरामपूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 107 रुग्णांपैकी नगर शहरातील 31, 
अकोले तीन, जामखेड तीन, कोपरगाव पाच, नगर ग्रामीण नऊ, नेवासे चार, पारनेर चार, पाथर्डी पाच, राहाता 12, राहुरी नऊ, संगमनेर चार, शेवगाव सहा, तसेच श्रीरामपूरमधील 12 रुग्णांचा समावेश आहे. 

अँटिजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्यांमध्ये नगर शहरातील 23, अकोले 45, जामखेड 31, कर्जत 33, कोपरगाव 26, नेवासे 36, पारनेर 27, पाथर्डी 15, राहाता 56, राहुरी 12, संगमनेर 46, शेवगाव 14, श्रीगोंदे 13, श्रीरामपूर 30 व भिंगारमधील आठ रुग्णांचा समावेश आहे. 

 

  • बरे झालेले रुग्ण : 37,531 
  • उपचार सुरू असलेले रुग्ण : 4,334 
  • मृत्यू : 694 
  • एकूण रुग्णसंख्या : 42,559 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today's corona meter of Ahmednagar at six hundred