
-मार्तंड बुचुडे
पारनेर : अतिशय मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या टोमॅटो व इतर काही भाजीपाला कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही, परिणामी शेतकऱ्यांना आता मोठी पश्चात्तापाची वेळ आली आहे. सध्या टोमॅटो आठ ते १० रुपये प्रती किलो दराने सध्या विकावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.