
बुधवारी एकाच दिवशी ६९५० साखर पोत्यांची निर्मिती झाली असून हंगामाच्या २३ दिवसात एक लाख २८ हजार ६५० साखर पोत्यांची निर्मिती झाली आहे.
सोनई (अहमदनगर) : सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्यात बुधवारी दिवसभरात ८०५० मेट्रीक टन ऊसाचे गाळप होवून ६९५० साखर पोत्याची निर्मिती झाली आहे. या विक्रमी गळीताबद्दल संचालक मंडळ, कर्मचारी व ऊसतोडणी कामगारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
'मुळा' चा यंदा ४३ वा ऊस गळीत हंगाम असून कार्यक्षेत्रात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. गळीत हंगामाचा २४ वा दिवस असून बुधवारी एकाच दिवसात ८०५० मेट्रीक टन ऊसाचे विक्रमी गळीत झाले असून आज अखेर एक लाख ५८ हजार ६१० मेट्रीक टन ऊसाचे गाळप झाले आहे.
बुधवारी एकाच दिवशी ६९५० साखर पोत्यांची निर्मिती झाली असून हंगामाच्या २३ दिवसात एक लाख २८ हजार ६५० साखर पोत्यांची निर्मिती झाली आहे. आजच्या गळीतात ८.७१ साखर उतारा आला असून २३ दिवसात सरासरी ८.५६ साखर उतारा मिळालेला आहे. 'मुळा'चे संस्थापक जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, मार्गदर्शक जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, अध्यक्ष, संचालक मंडळ अधिकारी, कर्मचारी व ऊस तोडणी कामगारांचे अभिनंदन होत आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले