भंडारदारा परिसरातील पर्यटन व्यवसाय अजूनही बंदच; व्यवसाय सुरु करण्यासाठी सरपंचावर दबाव

The tourism business in the Bhandardara area is still closed
The tourism business in the Bhandardara area is still closed

अकोले (अहमदनगर) : सध्या देशात व राज्यात कोरोनाने थैमान घातलेले आहे. सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना परवानगी दिली असली तरी मात्र भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसाय अजून बंदच असलेल्यांने ते सुरु करण्यासाठी सरपंचावर दबाव आणला जात आहे. तर अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. 

सध्या तालुक्यामध्ये दोनच कोविड सेंटर उपलब्ध असून हेही कोविड सेंटर कमी पडत आहेत. तर अकोले, राजुर, समसेरपुर सारखे मोठे शहर कोरोनाने बाधित झालेली असताना अतिदुर्गम आदिवासी भाग असलेला व कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध नसलेल्या भंडारदरा येथील पर्यटन सुरु करण्याचा अट्टाहास का केला जातोय? यापुर्वी या ठिकाणी कोरोनाचा शिरकाव पर्यटकांमुळेच झाला होता. परंतु ते रोखण्यात येतील ग्रामपंचायतीना यश आले आहे. 

भंडारदरा परिसरातील दिलेली सुरक्षा यंत्रणा काढुन घेतली असताना मोठ्या प्रमाणात बिना मास लावलेले व मोकोट हिंडनारे पर्यटक पाहवयास मिळाले आधीच आरोग्य सेवेचा तिन तेरा वाजले असताना या परिसरात कोविडचा शिरकाव झाल्यास याला जबाबदार कोण? याची सर्वश्वी जबाबदारी स्थानिक प्रशासन घेणार का? सरपंचांनी कोणकोणाशी वैर पत्करायचे? 

कोनाच्या फायद्यासाठी गोरगरीब आदिवासी माणसांचे जीवन धोक्यात घालणार असाल तर याचे परिणाम कुचकामी शासकीय अधिकाऱ्यांना भोगावेच लागतील, असे आवाहन स्थानिक रहिवाश्यानी केले आहे. याबाबत यापूर्वीच अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे. परंतु आदिवासी भाग असल्याने जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहवयास मिळालत आहे. 

इतर पर्यटन ठिकानाण प्रमाने पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व धरणाच्या सुरक्षासाठी या ठिकाणी एखादी पोलिस चेक पोस्ट असायला हवी होती. परंतु हे ठिकाण पर्यटन विकास विभागाच्या नजरेत दुर्लक्षित आहे, असे वाटत आहे. आदिवाशी लोकांच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर या ठिकाणी निवासी पोलिस चौकी उभारण्यात यावी, आशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणच्या लोकांचे आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन भंडारदरा परिसरातील पर्यटन व्यवसाय बंद केले आहे.

या बाबत नव्व गावाच्या ग्रामपंचायतीनी लोकांच्या सहमतीने ठराव मंजूर करून निर्णय घेतला आहे व हे ठराव स्थानिक प्रशासना पासुन ते मुख्यमंत्र्यां परंत पाठवली आहेत असे असताना काही व्यवसायिक जाणुन बुजुन सरपंचांना टार्गेट करत आहेत व शासकीय अधिकारी सहकार्य करत नसल्याने या भागातील सर्व सरपंच नाराजी व्यक्त केली. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com