नगरमध्ये दोन वनाधिकारी लाच घेताना पकडले | ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरमध्ये दोन वनाधिकारी लाच घेताना पकडले
नगर- लाच घेताना वनअधिकारी पकडले

नगरमध्ये दोन वनाधिकारी लाच घेताना पकडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : लाकूड वाहतुकीला परवानगी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नगर कार्यालयातील सहायक वनसंरक्षक सुनील पाटील आणि वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन दिवसांपूर्वी पकडले. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
एका तक्रारदाराच्या लाकडाची वाहतूक करणारे वाहन वन विभागाने पकडले होते. ते कारवाई न करता सोडून दिले. यासाठी तक्रारदाराकडून या दोघांनी ५० हजार रुपयांची मागणी केली.

हेही वाचा: प्रशासन व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्या कधी सोडवणार

त्यातील पहिल्या टप्प्यात ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराकडून ३० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील व थेटे यांना पकडण्यात आले.
लाचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाटील यांच्या नगरसह पुणे व धुळे येथील घरांची लाचलुचपत नाशिक विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी झडती घेतली. वन परिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांच्या नगरमधील घरीही झडती घेण्यात आली.

loading image
go to top