
जामखेड : साकत घाटामध्ये मकाचा ट्रक पलटी होऊन एकाचा मृत्यू झाला तर चालक थोडक्यात बचावला. रविवारी (ता.८) सकाळी आठ वाजता दहा टायर मालट्रक (एम.एच. १०, डी. टी. ६३२१) मका घेऊन चिखली (जि.जालना) येथून बारामतीला जात होता. जामखेड जवळील साकत घाटामध्ये पलटी होण्याचा अंदाज आल्याबरोबर मालट्रकचा चालक आणि क्लिनरने उडी घेतली. मालट्रकच्या खाली क्लिनर दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.