
तळेगाव दिघे : संगमनेर ते लोणी रस्त्यावर मालवाहू ट्रक आणि भाविकांना घेऊन जाणाऱ्या स्लीपरकोच ट्रॅव्हल बसची समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाला. सदर अपघातात जबर मार लागून तिघेजण जागीच ठार झाले, तर दहाजण गंभीर जखमी झाले. रविवारी (ता. १५) सकाळी सहा वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास कोकणगाव (ता. संगमनेर) शिवारात ही दुर्घटना घडली.