
पाथर्डी : तालुक्यातील येळी शिवारात कल्याण-विशाखापट्टणम् (निर्मल) राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास टेम्पो आणि ट्रॅव्हलर बसचा (एम. एच. २०, डी. डी. ०९६१) अपघात झाला. पाथर्डीकडे येत असलेल्या प्रवासी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली.