
शिर्डी (अहमदनगर) : नगर ते कोपरगाव रस्ता राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करावा. त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, मात्र अर्धवट दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करू नयेत. हा रस्ता केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केली आहे.
खासदार लोखंडे यांना शिंदे यांनी निवेदन दिले. यावेळी तुषार पोटे, राहुल गवळी, शब्बीर शेख, विजय जाधव, साईनाथ बोरावके, विष्णू पाडेकर, रवींद्र साबळे, सुनील साळुंके, यादवराव त्रिभुवन व मनोज बिडवे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की 13 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात सिन्नर ते नगर व्हाया शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 व सावळीविहीर फाटा ते पिंपळनेर व्हाया मनमाड- सटाणा हा राष्ट्रीय महामार्ग 160-बी (752-जी) रस्त्याचे काम केंद्र सरकारने करायचे ठरविले आहे. तथापि, कोपरगाव ते नगर राज्यमार्गाच्या अर्धवट दुरुस्तीपोटी 243 कोटी रुपये खर्च करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. एवढी प्रचंड रक्कम खर्चूनदेखील या रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही. त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागेल. हे लक्षात घेऊन कोपरगाव ते नगर हा रस्ता लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित केला जावा. तसे झाले, तर हा रस्ता कॉंक्रिटचा व सहा पदरी होईल. अर्धवट बांधकामे पूर्ण होतील, असे निवेदनात नमूद केले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.