सरपंच व उपसरपंच महिलाच झाल्याने होणार गावाचा कायापालट

The transformation of the village will take place as the Sarpanch and Deputy Sarpanch are women only
The transformation of the village will take place as the Sarpanch and Deputy Sarpanch are women only
Updated on

बोटा (अहमदनगर) : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मनीषा नवनाथ गाडेकर यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रशासनाच्या नियमांचे पालन करून पार पडली.

अध्यादेशीय अधिकारी सरपंच अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. तर सचिव म्हणून ग्रामसेवक अशोक बलसाने यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी मनीषा गाडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना नूतन उपसरपंच गाडेकर म्हणाल्या, गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच एकोप्याने काम करत आलो आहे.

भविष्यातही ग्रामविकासाचा रथ पुढे चालूच ठेवू. सरपंच अर्चना आहेर म्हणाल्या, आज दोन्ही महिला सरपंच व उपसरपंच पदांवर असल्याने महिलांच्या अडचणी सोडवण्यास प्रथम प्राधान्य देऊ. सद्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासह वाड्या वस्त्यांवर विविध विकास कामे झाली असून काही ठिकाणी कामे सुरूही आहेत. जेवढी विकास कामे करता येतील ती सर्व कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नक्कीच आम्ही करणार आहोत.

त्यामुळे भविष्यात घारगाव हे विकास कामांचे 'मॉडेल' झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही शेवटी त्यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com