esakal | श्रीरामपूर येथे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

A Traveling veterinary hospital has been started at Shrirampur.jpg

फिरत्या व्हॅनद्वारे सेवा देण्यासाठी लवकरच पशुवैद्यकीय तज्ज्ञ नियुक्त केले जातील. तोपर्यंत वरील पशू विकास अधिकारी दैनंदिन कामकाजासोबत पशुवैद्यकीय सेवा देतील. 

श्रीरामपूर येथे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (अहमदनगर) : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशू स्वास्थ्य योजनेंतर्गत फिरत्या पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी तालुक्‍याला मोबाईल व्हॅन मिळाली. संगमनेर, नेवासे व श्रीरामपूर विभागासाठी हे वाहन मिळाले असून, हा पायलट प्रकल्प आहे. पुढील काळात राज्यभरात सर्वत्र हा उपक्रम राबविला जाईल.
 
येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात नुकताच मोबाईल व्हेटर्नरी व्हॅनचा प्रारंभ झाला. आमदार लहू कानडे, पशुवैद्यकीय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. डी. पी. खपके, पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. बी. कोते, व्ही. आर. धिमते, एम. एम. धुमाळ, एस. एम. सानप उपस्थित होते. फिरत्या व्हॅनद्वारे सेवा देण्यासाठी लवकरच पशुवैद्यकीय तज्ज्ञ नियुक्त केले जातील. तोपर्यंत वरील पशू विकास अधिकारी दैनंदिन कामकाजासोबत पशुवैद्यकीय सेवा देतील. 

ग्रामीण भागात व्हॅनद्वारे पशुवैद्यकीय उपचार सुविधा यामुळे मिळणार आहे. पुढील काळात कॉल सेंटर सुरू करून पशुवैद्यकीय सेवेची व्याप्ती वाढविली जाईल, अशी माहिती डॉ. खपके यांनी दिली. माळवाडगाव, खानापूर, भामाठाण, हरेगाव, उंदीरगाव, भोकर, घुमनदेव, कमालपूर, महांकाळ वाडगाव, मुठेवाडगाव, माळेवाडी, सराला, गोवर्धन परिसरात पशुवैद्यकीय सेवा पुरविली जाणार असल्याचे डॉ. खपके यांनी सांगितले.

loading image