शाळा उघडल्या पण आदिवासी मुलं डोंगर-दऱ्यातच मग्न

शांताराम काळे
Thursday, 26 November 2020

अकोले तालुक्यात पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजली फक्त 21 शाळामध्ये मात्र अर्धा तासात विद्यार्थी शाळेतून घरी गेली. कारण ही तसेच होते पालकांचे संमती पत्र ,आमचे पालक संमती पत्र देणार नाही.

अकोले : तालुक्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी मात्र शाळेत यायला तयार नाहीत. आदिवासी भागातील डोंगर दऱ्या आणि वस्तीवर राहणारे विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना शेतात मदत, जनावरे सभाळणे, लाकूड फाटा गोळा करणे इत्यादी कामे करण्यास गुंतली आहेत. असे सर्वदूर चित्र पाहायला मिळत आहे.

अकोले तालुक्यात पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजली फक्त 21 शाळामध्ये मात्र अर्धा तासात विद्यार्थी शाळेतून घरी गेले. कारण ही तसेच होते पालकांचे संमती पत्र ,आमचे पालक संमती पत्र देणार नाही.

तुम्ही जबाबदारी घेणार असेल तर आम्ही येतो शाळेत नाही तर आमचा गाव बरा म्हणत विद्यार्थी नको ऑनलाईन, नको शाळा , कोरोनाला आवरा म्हणत शेतीच्या कामाला लागली आहेत. रोज सकाळी उठून गुरे जंगलात नेणे लाकूड फाटा गोळा करणे आई-वडिलांना मदत करण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळाली.

शिरपुंजे येथील संतोष खंडू धिंदळे व लक्ष्मी खंडू धिंदळे हे सातवीत व पाचवीत शिकणारी मुले लाकडे फोडताना दिसत होती. ते आश्रमशाळा शिरपुंज येथे शिक्षण घेतात. मात्र, शाळा बंद असल्याने मुले घरीच काम करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal students are not ready to come to school