नगर- सोलापूर महामार्गावर घोगरगाव येथे ट्रकची समोरासमोर धडक; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा

अशोक मुरुमकर
Wednesday, 30 December 2020

नगर- सोलापूर महामार्गावर घोगरगाव येथे बुधवारी सकाळी दोन मालट्रकची समोरासमोर धडक झाली.

अहमदनगर : नगर- सोलापूर महामार्गावर घोगरगाव येथे बुधवारी सकाळी दोन मालट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर वाहतुक कोंडी होऊन दोन्ही बाजून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

नगर- सोलापूर महामार्गावरल घोगरगाव येथे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे आहेत. त्यातूनच नगरकडील बाजूला स्मशानभूमीजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला.

एक मालवाहतुक ट्रक सोलापूरकडून नगरकडे जात होता. तर दुसरा मालवाहतुक ट्रक नगरहुन सोलापूरकडे जात होता. हा अपघात झाल्यानंतर सकाळी साडेसातच्या दरम्यान नगरकडील बाजूने वाहतुक कोंडी झाली होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुक सुरळीत करण्यासाठी इतर वाहनचालक मदत करत होते. यामधील जखमींची माहिती मिळू शकलेली नाही. करमाळ्यापासून नगरला नेमही काम व नोकरीनिमित्त येणाऱ्या नागरिकांना मात्र, वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A truck accident on at Ghogargaon on Nagar Solapur Highway