
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी ५९९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे.