Police Recruitment 2024 : पोलिस होण्याच्या स्पर्धेत तुषार जीवनाचा डाव हरला; कोठे बुद्रुक गावावर शोककळा

बबन भालके यांना तुटपुंजी शेती. तरीही आई-वडिलांनी तुषारला चांगले शिकवले. बहिणीचे लग्नही केले.
Police Recruitment 2024
Police Recruitment 2024Sakal
Updated on

संगमनेर : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. मुलाने पोलिस व्हावे, असे आई-वडिलांचे स्वप्न. या स्वप्नासाठी तीन वर्षांपासून मुलगा तयारी करत होता. मात्र, पोलिस भरतीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत धावताना तुषार बबन भालके (वय २७) या तरुणावर काळाने घाला घातला. पोलिस होण्याच्या स्पर्धेत तुषार जीवनाचा डाव हरला. या घटनेमुळे कोठे बुद्रुक (ता.संगमनेर) गावावर शोककळा पसरली.

बबन भालके यांना तुटपुंजी शेती. तरीही आई-वडिलांनी तुषारला चांगले शिकवले. बहिणीचे लग्नही केले. कोणत्याही परिस्थितीत मुलगा पोलिस झाला पाहिजे, हे आई-वडिलांचे स्वप्न होते. त्यामुळे तुषारनेही पोलिस होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले. तो अभ्यासही करत होता. तीन वर्षे पुण्यात राहून तयारी करीत होता. खासगी नोकरीही केली.

गावी आई-वडिलही शेतीत राबत होते. तयारी सुरू असताना तुषार राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी करत होता. कोणत्याही परिस्थितीत अधिकारी व्हायचेच, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

Police Recruitment 2024
Tractor Rally : नगरमध्ये जनआक्रोश आंदोलन! दूध दरवाढीसाठी ट्रॅक्टर मोर्चा

पुणे पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथील कवायत मैदानावर सुरू आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मैदानी चाचणी सुरू होती. तुषारसह इतर उमेदवार मैदानावर धावत होते. त्याचवेळी तुषार ट्रॅकवरच चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषारच्या मृत्यू झाल्याची बातमी कोठे बुद्रुक गावात पोहचताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते. संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आई-वडिलांनी अक्षरश: हंबरडाच फोडला. पहाटेच्या दरम्यान शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

Police Recruitment 2024
Ahmednagar News : कांद्याचे कोसळलेले भाव, दूध दर कपातीच्या निषेधार्थ नीलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्‍थळी थापल्या भाकरी

कुटुंबाचा आधारच हरपला

शासनाने या घटनेची दखल घेऊन नोकरीसाठी धडपड करणाऱ्या तुषारच्या कुटुंबीयांना मदत करण्याची गरज आहे. आर्थिक मदतीतून हे दुःख कदापी कमी होणार नाही. परंतु, जीवनाचा आधार असणारा तुषारच निघून गेल्याने आधार म्हणून शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. कष्टाला, जिद्दीला प्रोत्साहन द्यावे.

बबन भालके यांनी अतिशय काबाडकष्ट करून तुषारला शिकवले होते. तो पोलिस झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. तुषारवर काळाने घाला घातला असून त्याचा मृत्यू झाला असल्याने भालके कुटुंबाचा आधारच हरपला आहे. तुषारच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

- आशिष वाकळे, सरपंच, कोठे बुद्रुक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.