Twenty-one year old Sarpanch and twenty-two year old Deputy Sarpanch in Chapadgaon
Twenty-one year old Sarpanch and twenty-two year old Deputy Sarpanch in Chapadgaon

चापडगावात एकवीस वर्षांचा सरपंच, बावीस वर्षांचा उपसरपंच; लगेच लागले कामाला

कर्जत : सरपंच एकवीस, तर उपसरपंच बावीस वर्षांचा. दोघे पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले आणि निवडूनही आले. सरपंच आणि उपसरपंचपदी वर्णी लागली. गावकऱ्यांबरोबर घेत झाडू हातात घेऊन ग्रामस्वच्छता करीत त्यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात केली. गाव "आदर्श' करण्याचा संकल्प केला. 

महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार आणि माजी पंचायत समिती सदस्य (स्व.) नागेश घनवट यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी विकासकामांना सुरवात केली. विशेष म्हणजे दोघेही अविवाहित आहेत.

तालुक्‍यातील चापडगाव येथे सरपंच आणि उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने, सरपंचपदी संभाजी सोनवणे, तर उपसरपंचपदी रणजित घनवट यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच आप्पासाहेब घनवट, प्रकाश सपाटे व महादेव राऊत उपस्थित होते.

निवडीनंतर फटाके, मिरवणूक आणि सत्काराला फाटा देत, (स्व.) नागेश घनवट यांच्या प्रतिमेचे पूजन करून नूतन कारभाऱ्यांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. त्यांना ग्रामपंचायत सदस्य विक्रम निंबाळकर, जयदीप शिंदे, सुनीता धांडे, कल्पना काळे, शालन बेंद्रे, जयश्री वरडुळे, इंदूबाई सोनवणे व ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे यांनी सहकार्य केले. 

ज्येष्ठ नेते आप्पासाहेब घनवट व प्रकाश सपाटे, महादेव राऊत महाराज यांच्यासह ग्रामस्थांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. डिजिटल ग्रामपंचायत, वैद्यकीय सुविधा, अंतर्गत रस्ते, मुबलक पाणी, व्यायामशाळा, वाचनालय यांसह विविध विकासकामे करण्यात येतील. 
- रणजित घनवट, उपसरपंच, चापडगाव 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com