नगरमध्ये चालायचा आयपीएल सामन्यांवर सट्टा, दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two arrested for betting on IPL matches in Ahmednagar

नेवासे फाटा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी थांबून, मोटारीत (एमएच 17 सीएम 21) वरील दोघे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत

नगरमध्ये चालायचा आयपीएल सामन्यांवर सट्टा, दोघांना अटक

नेवासे : मोटारीत आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या दोघांना नेवासे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस कारवाईची माहिती मिळताच मुख्य सूत्रधार पसार झाला. नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासे फाटा येथे मंगळवारी (ता. 10) पोलिसांनी ही कारवाई केली. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बोरुडे (वय 36) व संतोष रंगनाथ गुंजाळ (वय 25, दोघे रा. रामडोह, ता. नेवासे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

नेवासे फाटा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी थांबून, मोटारीत (एमएच 17 सीएम 21) वरील दोघे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून नेवासे फाटा परिसरातील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या मोटारीवर छापा घालून वरील दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 34 हजार 700 रुपये, मोटार, सहा मोबाईल व अन्य साहित्य, असा 12 लाख 72 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत किरण पोपट जाधव (रा. घोडेगाव, ता. नेवासे) याचे नाव समोर आले. मात्र, जाधव याला पोलिस कारवाईची माहिती मिळताच तो पसार झाला.

याबाबत कॉन्स्टेबल रवी गोविंद पवार यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांनी तिघांविरुद्घ गुन्हा दाखल केला. 

loading image
go to top