काष्टीत आठ लाखांच्या गुटख्यासह दोघे अटकेत 

संजय आ. काटे
Saturday, 5 December 2020

काष्टी येथील पानटपऱ्यांवर गुटखाविक्री सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली.

श्रीगोंदे : श्रीगोंदे पोलिसांनी काष्टी येथील जाणता राजा व शिवकृपा पान सेंटर येथे छापे घालून तीन लाखांचा गुटखा व एक मारुती मोटार, अशा आठ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली. काल (गुरुवारी) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. 

काष्टी येथील पानटपऱ्यांवर गुटखाविक्री सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली.

सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉन्स्टेबल किरण बोराडे, प्रताप देवकाते, अमोल अजबे, कुलदीप घोळवे, किरण भापकर, संतोष कोपनर, गोकुळ इंगवले यांनी दोन टपऱ्यांवर छापे घातले.

तेथून तीन लाखांचा गुटखा व पाच लाखांची मारुती मोटार, असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी सचिन पांडुरंग कोकाटे व दीपक नाना टकले (दोघे रा. काष्टी) यांना अटक केली. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested with Rs 8 lakh in cash

Tags
टॉपिकस
Topic Tags: