esakal | ऐन दिवाळीत विहिरीने खाल्ले दोन भावंडांना, कुटुंबावर शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

Two brothers die after falling into a well

आविष्कार कांतिलाल सोनवणे (वय 6), कार्तिक कांतिलाल सोनवणे (वय 4) असे त्या मृत भावंडांची नावे आहेत. 

ऐन दिवाळीत विहिरीने खाल्ले दोन भावंडांना, कुटुंबावर शोककळा

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्‍यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीत पाय घसरून पडल्याने लहान भावंडाचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. त्यामुळे ऐन दिवाळीत कोळगाव गावावर शोककळा पसरली. 

आविष्कार कांतिलाल सोनवणे (वय 6), कार्तिक कांतिलाल सोनवणे (वय 4) असे त्या मृत भावंडांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी सोनवणे यांची दोन्ही मुले घरातील मंडळीची नजर चुकवून विहिरीकडे गेली.

विहिरीजवळ जाताच त्या दोघांही पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी कपडे काढून पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सायंकाळी घरी परतल्या त्यांना मुले घरी दिसले नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत.

घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीच्या बाजूला दोघांचे कपडे आढळून आले. नातेवाईकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आविष्कार याचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आला. त्याचा मृतदेह तातडीने पाण्याबाहेर काढण्यात आला.

घटनेची माहितीसमजताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने, तसेच कोळगावचे मंडळ अधिकारी डी. एम. डहाळे, घारगावचे कामगार तलाठी स्वप्नील होळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.