esakal | पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी नेवासेत दोन केंद्र; विद्यार्थ्यांची गैरसोय दुर 
sakal

बोलून बातमी शोधा

Two exam centers in Nevasa for final year examination of Pune University

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी नेवासेत दोन केंद्र; विद्यार्थ्यांची गैरसोय दुर 

sakal_logo
By
सुनिल गर्जे

नेवासे (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर एक केंद्र महाविद्यालयास देण्यात आले आहे. यात सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. 

परंतु, नेवासे तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुळा एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे परीक्षा नियंत्रक यांच्याशी संपर्क करून नेवासे तालुक्‍यात मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई व ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासे या दोन केंद्रांना मंजुरी मिळवली आहे.

नेवासे तालुक्‍यातील अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या सर्वच विभागाच्या विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून जवळच अंतिम वर्षाची परीक्षा कोरोनाची काळजी घेत देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशांत गडाख यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नेवासे तालुक्‍यात दोन परीक्षा केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image