
पाथर्डी : आरटीओ कार्यालयाचा लोगो लावलेल्या जीपमध्ये खाकी गणवेश घालून वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तोतया आरटीओ अधिकाऱ्यांच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक सुनील पाटील यांनी फिर्याद दिली असून, या घटनेतील दोघाही तोतया अधिकाऱ्यांना बीड जिल्ह्यातील एलसीबीच्या पथकाने अटक केली.