गुहा येथील जुना सात्रळ रस्त्यावरील ओहोळ-भालेराव कुटुंबांत धुमश्चक्री झाली. भालेराव कुटुंबाने कुऱ्हाड व कुदळीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप ओहोळ कुटुंबाने केला. तर, बांधाच्या वादातून ओहोळ कुटुंबाने लोखंडी पाइप, कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप भालेराव कुटुंबाने केला.
राहुरी (अहमदनगर) : गुहा येथे शेताच्या बांधावरून सोमवारी (ता. 4) सकाळी दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात कुऱ्हाडीसह लाकडी दांडके, लोखंडी पाइपचा वापर झाला. परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांच्या 16 जणांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, सर्व आरोपी पसार झाले आहेत.
गुहा येथील जुना सात्रळ रस्त्यावरील ओहोळ-भालेराव कुटुंबांत धुमश्चक्री झाली. भालेराव कुटुंबाने कुऱ्हाड व कुदळीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप ओहोळ कुटुंबाने केला. तर, बांधाच्या वादातून ओहोळ कुटुंबाने लोखंडी पाइप, कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप भालेराव कुटुंबाने केला.
सिद्धार्थ राजेंद्र ओहळ (वय 30) यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब दगडू भालेराव, सतीश दगडू भालेराव, दगडू लक्ष्मण भालेराव, सुरेश भागवत ओहोळ, राहुल सुरेश भालेराव, रवींद्र दगडू भालेराव, अशोक सुरेश भालेराव (सर्व रा. गुहा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाळासाहेब दगडू भालेराव (वय 35) यांच्या फिर्यादीवरून अशोक गणपत ओहोळ, नंदा अशोक ओहोळ, राजेंद्र गणपत ओहोळ, सुनिता रमेश ओहोळ, सुनिता राजेंद्र ओहोळ, निखील राजेंद्र ओहोळ, अक्षय राजेंद्र ओहोळ, प्रवीण अशोक ओहोळ, विकास रमेश ओहोळ (सर्व रा. गुहा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.