नगर जिल्ह्यात पुन्हा अडीचशे कोरोना रूग्ण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 65 हजार 293, तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 62 हजार 736 झाली. कोरोनामुळे आतापर्यंत 968 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1589 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 96.08 झाली.

नगर ः जिल्ह्यात 171 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात नव्याने 252 बाधित आढळून आले. 

जिल्ह्यातील बाधितांची संख्या 65 हजार 293, तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 62 हजार 736 झाली. कोरोनामुळे आतापर्यंत 968 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1589 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 96.08 झाली.

जिल्हा रुग्णालयाच्या तपासणी अहवालात 110, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 37, तर अँटीजेन चाचणीत 105 जण बाधित आढळले. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा दोनशेच्या आत येत होता. मात्र, आज बाधितांच्या आकड्याने अडीशेचा टप्पा ओलांडला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred and fifty corona patients again in Nagar district