Ahmednagar Lightning : वीज पडून दोघांचा मृत्यू, एक जखमी

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर शिवारातील घटना
Two killed one injured due to lightning Srirampur ahmednagar
Two killed one injured due to lightning Srirampur ahmednagarsakal

श्रीरामपूर : वादळी वार्यासह शेतात वीज पडल्याने दोन जणांचा मृत्यू, तर एक महिला जखमी झाली. दहा घरांचेही नुकसान झाले आहे. भेर्डापूर (ता. श्रीरामपूर) गावात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तसेच मालुंजे गावातही वीज पडल्याने तीन ते चार एकर ठिंबक संच जळाला, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

प्रमोद भाऊसाहेब दांगट (वय ४२), अलका रामदास राऊत (वय ५०) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. संगीता रवींद्र साळे (वय ४२) ही शेतमजूर महिला जखमी झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळी वार्यासह पावसाला सुरवात झाली. यामुळे द्राक्ष बागेत गवत काढत असलेल्या महिलांना घरी सोडण्यासाठी प्रमोद दांगट यांनी आपली दुचाकी काढली.

यावेळी त्यांच्यासह गाडीवर अलका राऊत ह्या बसल्या, तर संगीता साळे ह्या बाजूला उभ्या होत्या. त्याचदरम्यान वीज गाडीवर पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले, तर साळे ह्या बेशुद्ध पडल्या. घटना शेतात घडल्याने वेळेत मदत पोहोचू शकली नाही. माहिती मिळाल्यानंतर जखमींना साखर कामगार रूग्णालयात आणण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून दांगट व राऊत यांना मृत घोषित केले.

साळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच वादळी वाऱ्यामुळे गावातील अंदाजे १० घराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे व तलाठी बाबा कदम यांनी वर्तविला आहे.

दरम्यान, मालुंजे येथील विष्णुपंत मुरलीधर बडाख यांच्या शेतातील छप्परावरही वीज पडली. यात तीन ते चार एकर ठिबक संच जळून खाक झाले. चार गाया दोर तोडून पळाल्या, तर मजुराच्या कुटुंबातील चार सदस्या याठिकाणी होते. मात्र, ते सुदैवाने बचावल्याची माहिती बडाख यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, दीपक पटारे, सचिन गुजर, नाना पवार, शरद नवले, वंदना मुरकुटे, सुरेश वाबळे आदींनी साखर कामगार रुग्णालायात धाव घेतली.

नातेवाईकांकडे चौकशी करून जखमीची विचारपूस केली. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दशरथ चौधरीही तत्काळ रूग्णालयात दाखल झाले. पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना खासदार लोखंडे यांनी त्यांना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com