
शिरूर : कारेगाव (ता. शिरूर) येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या बहिणीकडे चार दिवसांपूर्वी आलेल्या १९ वर्षीय परप्रांतीय तरुणीला ब्लॅकमेल करीत दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्यासोबतच्या मामेभावासह तिला मारहाण करून लुटले. या प्रकाराची वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली.