esakal | गुन्हेगारी कमी करण्यासाठी नगर जिल्ह्यात आता ‘टु प्लस’
sakal

बोलून बातमी शोधा

Two plus now in Nagar district to reduce crime

अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी कंबर कसली आहे.

गुन्हेगारी कमी करण्यासाठी नगर जिल्ह्यात आता ‘टु प्लस’

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील वाळू तस्कर, शरीर व माला विरुद्धचे गुन्हेगार यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध 'Two plus' सिस्टीम वापरून, गुन्हेगारांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंगळवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक पाटील यांनी राहुरी पोलिस ठाण्यातील कामकाजाचा आढावा घेतला. राहुरीचे कारागृह, ठाणे अंमलदार यांची नोंदवही, वायरलेस यंत्रणा आदींची पाहणी केली.

अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी, उपअधीक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, श्रीरामपूर तालुका पोलिस निरीक्षक मकसूद खान उपस्थित होते. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील वाळू तस्कर, शरीर व माला विरुद्धचे गुन्हेगार यांची माहिती महिनाभरात संकलित होईल. तोपर्यंत त्यांच्यावर काय कारवाई करायची, पुढच्या वेळी एखादा गुन्हा केला. तर, काय कारवाई करणे आवश्यक आहे. याचे नियोजन केले जाईल. यालाच 'Two plus' सिस्टीम म्हणतात. गुन्हेगारी व गुन्हेगारांचे उच्चाटन करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.

नगर जिल्ह्यात नवीन पोलिस ठाण्यांना परवानगी मिळाली आहे. ती लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. घरफोडी, दरोड्यातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निष्पन्न झाले. त्यांना अटक करणे आवश्यक आहे. निष्पन्न आहेत. परंतु, फरार आहेत. त्यांचा शोध घेणे, फरारीची प्रक्रिया आहे. त्याप्रमाणे कारवाई करणे गरजेचे आहे. त्याबद्दल माहिती घेऊन अधिक काय करता येईल. याचा निर्णय घेतला जाईल.
पेट्रोलिंगच्या वाहनांची देखभाल दुरुस्ती करून, सुस्थितीत जनतेच्या सेवेला कशी राहतील. याची काळजी घेतली जाईल. काही नादुरुस्त वाहने शासनाकडे परत पाठवली जातील. पेट्रोलींगच्या वाहना बाबत शासन सकारात्मक आहे. लवकरच नवीन वाहने मिळतील. पेट्रोलिंगमध्ये वाढ होईल.

चिखलठाण येथे पोलिस कर्मचारी वरिष्ठांसाठी वाळू तस्करीचा हप्ता वसुली करतांना पैशांची मागणी करीत असल्याचा व्हिडिओ, त्याबद्दल पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलिस कर्मचारी श्रीकृष्ण केकान यांच्याविरुद्ध तक्रार अर्जाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. व्हिडिओची सत्यता पडताळून, तथ्य आढळले. तर, संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर