
त्यातील एका टेम्पोतील जणांवरे शेतकऱ्यांची असून त्यांनी ते लोणी येथील बाजारात विक्रीसाठी सकाळी नेली होती. परंतु योग्य दर न मिळाल्याने पुन्हा माघारी वक्ती-पानवी येथे घेवून जात होता.
श्रीरामपूर (अहमदनगर) : राहता तालुक्यातील लोणी येथून वक्ती-पानवीसह (ता. वैजापूर) तालुक्यातील अशोकनगर येथे जणांवरे घेवून जाणारे दोन टेम्पो शहरातील दोन तरुणांनी संशयास्पद अडविली. येथील शिवाजी चौकात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित तरुणांनी जणांवरे भरलेली दोन्ही टेम्पो शहर पोलिस ठाण्यात आणली.
हे ही वाचा : रयत संकुलात विविध उपक्रम उत्साहात ; बोरावके महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
दरम्यान, त्यातील एका टेम्पोतील जणांवरे शेतकऱ्यांची असून त्यांनी ते लोणी येथील बाजारात विक्रीसाठी सकाळी नेली होती. परंतु योग्य दर न मिळाल्याने पुन्हा माघारी वक्ती-पानवी येथे घेवून जात होता. तर दुसऱ्या टेम्पोतील जणांवरे ऊसतोड मजूरांची असून ते अशोकनगर परिसरात घेवून जात असल्याचे उघडकीस आले. परंतु तोपर्यंत वाहनांची संशयास्पद भर चौकात अडवणूक केलेले दोन कार्यकर्ते पोलिस ठाण्यातून पसार झाले होते. त्यामुळे जणांवरे भरलेली दोन्ही टेम्पो शहर पोलिस ठाण्यासमोर उभी करण्यात आली. चौकशी करुन वाहनांची अडवणूक केल्याप्रकरणी तक्रार देण्याची मागणी उपस्थित पोलिस निरिक्षक यांनी केली. परंतु सदर टेम्पो चालक आणि जणावरांच्या मालकांनी तक्रार देण्यास नकार दर्शविला.
ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा
तरुणांनी घेतलेला संशय आणि पोलिस कारवाईच्या घोळात तब्बल तीन तास जणांवरे पोलिस ठाण्यात टेम्पोमध्ये अडकून पडल्याचा प्रकार घडला. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी छापेमारीच्या कारवाईसाठी कोल्हार परिसरात गेल्याने वाहन अडविल्या प्रकरणी फिर्याद देण्याची मागणी उपस्थित पोलिस निरिक्षक यांनी केली. अन्यथा वरिष्ठ पोलिस अधिकारी ठाण्यात येईपर्यंत जणांवरे सोडणार नसल्याचा अजब सल्ला दिला. त्यामुळे जणांवरे टेम्पोमध्येच अडकून पडली.
टेम्पोतील जणांवरे शेतकऱ्यांची असून संशयास्पद पोलिस ठाण्यात अडकल्याने तातडीने सोडण्याची मागणी शहर परिसरातील काही प्राणी मित्रांसह कार्यकर्त्यांनी केली. परंतु तक्रार दाखल केल्याशिवाय जणांवरे सोडता येणार नसल्याची भूमिका उपस्थित पोलिस निरिक्षक यांनी घेतल्याने जणावरांसह शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली. पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत हा प्रकार सुरु असल्याने नाईलाजाने टेम्पोतून जणांवरे खाली उतरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.
संपादन - सुस्मिता वडतिले