esakal | जी.एस.महानगर बँकेस ६१ कोटी ८३ लाखांचा नफा : अ‍ॅड.उदय शेळके

बोलून बातमी शोधा

Uday Shelke has said GS Mahanagar Bank has made a profit of Rs 61 crore

बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती देताना शेळके म्हणाले, बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून, बँकेकडे दोन हजार ६९९ कोटी ७८ लाख रूपयांच्या ठेवी आहेत.

जी.एस.महानगर बँकेस ६१ कोटी ८३ लाखांचा नफा : अ‍ॅड.उदय शेळके
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : मुंबईत मुख्य कार्यालय असणा-या जी.एस.महानगर बँकेस ३१ मार्च अखेरीस ६१ कोटी ८३ लाखांचा नफा झाला आहे. सर्व तरतुदी वजा जाता २५ कोटी १९ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय शेळके यांनी दिली.

बँकेच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती देताना शेळके म्हणाले, बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून, बँकेकडे दोन हजार ६९९ कोटी ७८ लाख रूपयांच्या ठेवी आहेत. कर्जवाटपामध्ये वाढ होत १ हजार ६९२ कोटी नऊ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचे भागभांडवल ७४ कोटी ८८ लाख रूपये आहे. गुंतवणूक एक हजार २१४ कोटी ७२ लाख रूपयांची आहे. खेळते भागभांडवल तीन हजार १७० कोटी ५९ लाख रूपये आहे. स्वनिधी ३७२ कोटी ७० लाख रूपयांचा आहे. एनपीएचे प्रमाण ३.८२ टक्के आहे.

स्पर्धेच्या युगाची गरज ओळखून बँकेत कोअर बँकिंग, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग या सुविधा पुरविण्यासाठी अत्याधुनिक कार्यप्रणाली अद्यावत करून सी.टी.एस तसेच जलद गतीने फंड ट्रान्सफर करण्यासाठी आरटीजीएस, एनईएफटी, रूपे डेबिट कार्ड या सुविधा पुरविण्यावर भर दिला आहे. बँकेने सातत्याने शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यांना आधार देण्याची महत्वाची भुमिका बजावलेली आहे.