

Maharashtra Ujani Dam Water Discharge Boosts Bhima River Flow and Provides Relief to Villages Dependent on River Water Supply Schemes
sakal
श्रीगोंदे: पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणातून पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांची गरज लक्षात घेऊन भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला वीज निर्मिती केंद्राच्या माध्यमातून १ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून, शनिवारी (ता. २४) सकाळी सांडव्यावरील विसर्ग वाढवून एकूण ४ हजार ५०० क्युसेक केला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांतील पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, या भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.