

Ujani Dam News Unregulated Water Extraction Raises Concerns as 77 Percent Water Storage Remains in the Reservoir
sakal
सिद्धटेक: पूर्णपणे भरण्यासारखी परिस्थिती नसतानादेखील उजनी धरण यावर्षी २७ जुलै रोजी पूर्ण भरले. परंतु, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जवळपास तीन महिन्यांच्या सततच्या व पाणीउपशामुळे धरणात आजअखेर केवळ ७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अशा प्रकारच्या अनिर्बंध पाणीउपशामुळे उजनी फुगवट्याची आजची स्थिती आता केवळ एखाद्या बंधाऱ्याप्रमाणे झाली आहे.