
-सचिन गुरव
सिद्धटेक : वसंत ऋतूच्या स्वागताला सज्ज झालेला निसर्ग, पानगळती होऊन पुन्हा एकदा नवती फुटलेली वनराजी, उंच उंच डेरेदार वृक्षांवर नानाविध पक्ष्यांनी बनवलेली घरटी, नवजात पक्ष्यांची पंखात हवा भरून पॅराग्लायडिंगप्रमाणे ठरावीक अंतराचा फेरफटका मारून पुन्हा फांदीवर बसण्यासाठीची कसरत... स्थलांतरित पक्ष्यांसाठी ‘टर्मिनल’ ठरत असलेल्या भीमा नदीकाठावर सुमारे ३०० हून अधिक प्रजातीचे पक्षी स्थिरावले आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी नदीकाठावर ठिकठिकाणी लपणगृह आणि निरीक्षण मनोरे उभारल्यास पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे.