
श्रीगोंदे : तालुक्यातील उख्खलगाव परिसरात रविवारी (ता.८) दुपारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे ओढ्याला अचानक पाणी वाढल्याने भाऊसाहेब हरिभाऊ कोरेकर (वय ४२) हे शेतकरी त्यात वाहून गेले. आमदार विक्रम पाचपुते यांनी सोमवारी (ता.९) भेट घेऊन कोरेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. पिकांचे पंचनामे करून अहवाल पाठवावा अशासूचना प्रशासनाला दिल्या आहेत.