सुरक्षा रक्षक मंडळातर्फे कामगारांना गणवेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

सुरक्षा रक्षक मंडळातर्फे कामगारांना गणवेश व सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, निरीक्षक सुनील देवकर, उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे, सचिव मधुकर केकाण, भैरू कोतकर आदी उपस्थित होते. 

नगर ः कामगारांच्या कल्याणासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविले जात असतात. त्यांना विमा संरक्षण, सुरक्षित साधनांचे वाटप, भत्ता, ओळखपत्र अशा शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो, असे प्रतिपादन सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांनी केले. 

सुरक्षा रक्षक मंडळातर्फे कामगारांना गणवेश व सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, निरीक्षक सुनील देवकर, उपाध्यक्ष गोविंदराव सांगळे, सचिव मधुकर केकाण, भैरू कोतकर आदी उपस्थित होते. 

राऊत म्हणाले, की सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी साहित्याचे वाटप करून त्यांच्या काळजी घेतली आहे. कामगारांनीही काम करताना काळजी घ्यावी, सुरक्षित साधनाचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक सुनील देवकर यांनी केले. सूत्रसंचालन गोविंद सांगळे यांनी तर, मधुकर केकाण यांनी आभार मानले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uniforms to the workers by the Board of Security Guards