सरपंच पल्लवी पवार एमएस्सी बीएड शिक्षण पूर्ण करुन सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. पुण्यात तिने क्लास लावले आहेत.
Nimbhari Gram Panchayat Sarpanch Pallavi Pawar : सोनई (अहिल्यानगर) मुळा आणि प्रवराथडीला असलेल्या अनेक गावांच्या राजकीय पटलावर विशेष नोंद असलेल्या निंभारी (ता. नेवासे) गावच्या सरपंचपदाचा (Nimbhari Sarpanch) मान अवघ्या पंचवीस वर्षाच्या अविवाहित असलेल्या कुमारी पल्लवी संजय पवार (Pallavi Pawar) हिने पटकावला आहे. राजकीय आखाड्यातील ज्येष्ठ आणि धुरंधर कार्यकर्त्यांचे डावपेच वेगळेच असताना पल्लवी नऊ सदस्य असलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत पाच मते मिळवून गावची कारभारीन झाली आहे.