
-मच्छिंद्र अनारसे
कर्जत शहर : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आतापर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. याची दखल घेऊन या शाळेचे तालुका मास्तर कै. विनायक भैलुमे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. शिक्षण विभागात या शाळेचा दबदबा होता, आज मात्र या शाळेची दुरवस्था झाली आहे. धोकादायक इमारतीत येथील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.