
अहिल्यानगर : जिल्ह्यात अवकाळीसह वादळाच्या तडाख्यामुळे मंगळवारी (ता.२०) कर्जत. श्रीगोंदे, नगर, नेवासे, राहाता, पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील गावांना तडाखा बसला. अवकाळी पावसामुळे नगर तालुक्यात एक जण जखमी झाला, तर चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. २५ घरांची पडझड झाली, तर सहा गोठेही पडले आहेत. फळबाग, भाजीपाल्यासह चारा पिकांचे नुकसान झाले आहे.