
अहिल्यानगर- पाथर्डी : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस (आयएफएस) परीक्षेत जिल्ह्यातील दोघांनी यश मिळविले आहे. अहिल्यानगरची अश्विनी परकाळे-भगत, तर पाथर्डीचा हरिओम दगडू पालवे यांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही अहिल्यानगरच्या तिघांनी बाजी मारली आहे.