esakal | अर्बन बँक फसवणुक प्रकरण : तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; कर्जदारांचे धाबे दणाणले!
sakal

बोलून बातमी शोधा

urban bank

अर्बन बँक फसवणुक प्रकरण : तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

शेवगाव (जि.अहमदनगर) : नगर अर्बन बँकेच्या (urban bank) येथील शाखेत बनावट सोने (fake gold) तारण ठेवून केलेल्या फसवणूकप्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरसह (gold valuer) १५९ कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी बँकेच्या शाखेत जाऊन (ता.३) घटनास्थळाचा पंचनामा केला. फसवणुकीची रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने, हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. यामुळे कर्जदारांचे धाबे दणाणले आहेत.

कर्जदारांचे धाबे दणाणले

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यामध्ये १५९ कर्जदारांचा समावेश आहे. त्यातही एकाच घरातील पती-पत्नी, पिता-पुत्रांचा समावेश आहे. मंगळवार (ता.३) पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी बँकेच्या शाखेत जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या संदर्भातील चौकशीसाठी लागणारे कागदपत्रे शाखेतून हस्तगत केली. गैरव्यवहारातील रक्कम ५० लाखांपेक्षा जास्त असल्याने हा गुन्हा नगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान कालपासून कर्जदार खातेदारांचे धाबे दणाणले आहेत. अनेक जण नॉट रिचेबल झाले असून, या कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी कायदेशीर सल्लामसलती सुरू झाल्या आहेत. शाखा व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणाची शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल आहुजा, बँक बचाव समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा यांच्याकडे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी प्राथमिक चौकशी केली. अर्बन बँकेच्या नगर मुख्य शाखेतील सहायक व्यवस्थापक व चौकशी अधिकारी मनोज फिरोदिया चौकशीस उपस्थित राहीले नाहीत.

हेही वाचा: सुरेश वाडकर म्हणतात, 11 वर्षांपासून मी वनवास भोगतोय..

हेही वाचा: नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत वादावर तूर्त पडदा!

loading image
go to top