हा फंडा वापरा ज्वारीचे ३० टक्के उत्पादन वाढेल

रहेमान शेख
Friday, 18 September 2020

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), कृषी विभाग, जिल्हा बीजप्रमाणीकरण यंत्रणा व इक्रिसॅट, हैदराबाद यांच्यातर्फे एकदिवसीय रब्बी ज्वारी बीजोत्पादन पूर्वतयारी ऑनलाइन चर्चासत्र झाले.

राहुरी विद्यापीठ : ंराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), कृषी विभाग, जिल्हा बीजप्रमाणीकरण यंत्रणा व इक्रिसॅट, हैदराबाद यांच्यातर्फे एकदिवसीय रब्बी ज्वारी बीजोत्पादन पूर्वतयारी ऑनलाइन चर्चासत्र ते झाले. 

प्रमुख पाहुणे म्हणून इक्रिसॅट, हैदराबादचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कुमार, पुण्याचे विभागीय सहसंचालक दिलीप झेंडे उपस्थित होते.

विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने तयार केलेल्या रब्बी ज्वारी पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात 20 ते 30 टक्के वाढ होईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले. 

महाबीज'चे अकोला येथील महाव्यवस्थापक सुरेश पुंडकर, नगरचे विभागीय बीजप्रमाणीकरण अधिकारी यशवंत कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, सोलापूरचे रवींद्र माने, "महाबीज'चे जिल्हा व्यवस्थापक आर. सी. जोशी व वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. अशोक जाधव उपस्थित होते. 

डॉ. शरद गडाख म्हणाले, की या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे आगामी रब्बी हंगाम चांगला होईल, असा आशावाद शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील धरणांत पुरेसा पाणीसाठा झाला असून, रब्बीतील पिकांना पाण्याची गरज भासल्यास पाटपाण्याद्वारे ती पूर्ण होईल, असे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर रब्बी ज्वारीचे बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा. 

डॉ. अशोक कुमार म्हणाले, की 10 ते 12 वर्षांत रब्बी ज्वारीच्या पिकामध्ये कृषी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने तयार केलेल्या विविध वाणांमुळे उल्लेखनीय काम झाले. चर्चासत्रात डॉ. सुदाम निर्मळ, डॉ. मनाजी शिंदे, डॉ. उत्तम कदम यांनी मनोगत व्यक्‍त केले. डॉ. डी. डी. दुधाडे यांनी आभार मानले.

या ऑनलाइन कार्यक्रमासाठी नगर व सोलापूर जिल्ह्यांतील रब्बी ज्वारी बीजोत्पादन घेणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use this fund to increase sorghum production by 30 percent